चांगल्या संस्कारासाठी चांगले विचार व चांगला स्वभाव आवश्यक? स्वभाव....... स्वभाव जर चांगला असेल तर दूरची मंडळीही जवळ येतात. अन् स्वभाव जर वाईट असेल तर जवळची मंडळीही दूर जातात. उदाहरण द्यायचं झाल्यास रावणाचं देता येईल. रावणाचा स्वभाव हा वाईट असल्याचं जाहीर असल्यानं त्याचा सख्खा भाऊ त्याचेपासून दूर गेला तर रामाचा स्वभाव चांगला असल्यानं त्याचा सख्खा भाऊ लक्ष्मणही त्याच्या जवळ राहिला. म्हणूनच स्वभाव हा अतिशय महत्वपुर्ण आहे. माणसाचा स्वभाव हा महत्वाचा आहे. तसंच महत्वाचं आहे त्याचं कार्य. कार्य जर चांगले असतील तर चार माणसं जुळत जातात. जसं रामासोबत घडलं. रामाचे कार्य चांगलं असल्यानं रामासोबत अनेक