Chapter 17 : मागं वळून बघू नकोस एक वर्ष उलटलं होतं . झाड अजूनही तिथंच उभं होतं – ताठ , मजबूत , पण आता त्याच्याभोवती शांतता आणि आदर दोन्ही जाणवत होते . गावातला तो दिवस आला होता – ज्या दिवशी प्रत्येक गावकरी झाडाजवळ जमतो , दीप लावतो आणि त्या पाच आत्म्यांना वंदन करतो . प्रियंका आता गावातली एक शिक्षिका झाली होती. ती मुलांना फक्त पुस्तकी शिक्षणच शिकवत नव्हती , तर सत्य , न्याय आणि संवेदनशीलतेचं महत्त्वही सांगत होती . पुन्हा एक वेगळी चाहूल त्या दिवशी संध्याकाळी, प्रियंका एकटी स्मारकाजवळ बसली होती. हवेत गारठा होता, पण मनात समाधान होतं. तेवढ्यात मागून