*शिक्षकांनी आपली वागणूक बदलवावी?* *सर्वच शिक्षक हे विद्यार्थ्यांचा राग करीत नाहीत. ते भेदभावही करीत नाहीत. ते विद्यार्थ्यांशी अतिशय सौजन्यानं वागत असतात. कधी रागवत असतीलही. परंतु ते रागावणं त्यांचं प्रेममयी असतं नव्हे तर विद्यार्थ्यात संस्कार फुलविण्यासाठी असतं. विद्यार्थी हा संस्कारी बनावा असंच शिक्षकांना वाटत असतं. मात्र काही शिक्षक त्यातही अपवाद असतातच. ज्यांच्या शिकविण्यातून दैत्यही तयार होत असतात. दुर्योधन व दुःशासनही तयार होत असतात. तसेच कोणकोणते शिक्षक एकलव्याचे अधिकारही नाकारत असतात. यात शंका नाही.* शिक्षक असा एक निसर्ग प्रक्रियेतील घटक आहे की जो नियम शिकवतो. त्याचा जन्मच मुळात सृष्टीचं रक्षण करण्यासाठी झालेला असतो. त्याचेसमोर येणारा