अनुबंध बंधनाचे.....( भाग ४८ )काही दिवसांनी ते दोघे त्याच ठिकाणी भेटतात. ते दोघेही खुप वेळ गप्पा मारत बसले होते. पण कोणीही त्या विषयावर बोलत नव्हते. वैष्णवीला वाटत होते त्याने काहीतरी बोलावे, आणि प्रेमला वाटत होते तिने हा विषय काढावा. खुप वेळ ते दोघे इतर विषय काढून बोलत होते. अखेरीस प्रेमला राहवत नाही. तो तिला बोलतो...प्रेम : वैष्णवी....! अजुनही तुला असच वाटतं का...! की, आपलं नातं हे फक्त मैत्रीपूरतच आहे...? * वैष्णवीला काय बोलावं हे सुचत नव्हते, थोडं थांबुन ती बोलली....वैष्णवी : म्हणजे....?प्रेम : म्हणजे मला काय बोलायचं आहे हे तुला कळत आहे, पण तु उगाच असे प्रश्न का करतेय.वैष्णवी : मला नाही