ऐलोमा पैलोमा गणेश देवा माझा खेळ मांडू दे करीन तुझी सेवा ..रेडिओवर हे गाणे ऐकताना हादग्याच्या आठवणीनी मन जणु झुल्यावर झुलू लागलं माझ्या लहानपणी मुलगी सात आठ वर्षाची झाली की हादगा घालावा अशी घरी चर्चा सुरु व्हायची .मुलीना तर हादगा घालायची कधीचीच गडबड झालेली असायची कारण सोबतच्या मैत्रिणींच्या घरी हादगा खेळायला त्या जात असत .त्यामुळे ती गंमत आपल्या घरी कधी होणार ह्याची आतुरता खुप असायची .आश्विन महिन्यात हस्त नक्षत्राचा आरंभ होतो.त्या दिवसापासून पुढचे सोळा दिवस किंवा नवरात्राच्या पहिल्या दिवसा-पासून पौर्णिमेपर्यंत हदग्याच्या निमित्ताने मुली एक खेळ खेळतात. ह्या खेळाला हादगा म्हणतात. तसेच यास भोंडला असेही नाव आहे. काही ठिकाणी याला भुलाबाई म्हणून सुद्धा ओळखले जातेहादग्याच्या खेळात