कावळ्याचा निबंध

  • 246
  • 69

*कावळ्याचा निबंध*         माझा आवडता पक्षी *कावळा* या विषयावर शालेय जीवनात कधी निबंध लिहिता आला नाही. माझा आवडता पक्षी मोर किंवा फार तर पोपट इतकच आम्ही लिहीत राहिलो. आम्ही शिकत होतो तेव्हा इयत्ता दुसरीच्याच पुस्तकात *चतुर कावळा* असा धडा होता. त्यात कावळ्याला खूप तहान लागते. खूप भटकून त्याला कुठे पाणी प्यायला मिळत नाही. खूप थकल्यावर त्याला एक रांजण दिसतो. मात्र तो रांजण खूप मोठा असून त्याच्या तळाशी अगदी थोडेसेच पाणी असते.तळाशी असलेलं पाणी कसे प्यावे या विचारात असतांना कावळ्याने आपल्या चोचीतून एकेक दगडाचा खडा आणून त्या रांजणात टाकत राहिला. खूप साऱ्या दगडाचे खडे त्या रांजणात टाकल्यानंतर पाणी वर