चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेत असतात

चांगले संस्कारच माणसाला उच्च पातळीवर नेतात?            संस्कार....... म्हणतात की जिथे चांगले संस्कार असतात. तिथे लक्ष्मी व सरस्वती निवास करीत असते आणि जिथं कुसंस्कार असतात. तिथं तसं घडत नाही. जे सकाळी नित्यानं मदिराप्राशन करतात. तिथं लक्ष्मी जास्त काळ राहात नाही व मदिरा प्राशन करणाऱ्यांची समाजात इज्जतही नसते. लोकं त्याला वाईट म्हणतात. कारण सुरा ही समुद्रमंथनानातून दानवांना मिळाली. देवांना नाही. हे म्हणणं खरं आहे. त्यामुळे, ज्या घरी दारु व मांसाचं सेवन केलं जातं. तिथं लक्ष्मी टिकतच नाही. विद्याही कामात येत नाही. तशीच संगतही महत्वाची असते. आपली संगत चांगल्याशी असेल, तर आपली लोकं इज्जत करतात आणि वात्रटाशी असेल