सिनेमा, गाणी

सिनेमा आणि गाणी-हिंदी मराठी सिनेमाचा १९७० ते १९९० हा काळ वेगळाच होता.कोल्हापुरातील लक्ष्मीपुरीत पद्मा, शाहू, राजाराम, रॉयल, प्रभात ही पाच, तर व्हिनस , लिबर्टी व उषा ही तीन व्हिनस कॉर्नरला, बसंत , बहार कलेक्टर ऑफीसजवळ तर उमा , पार्वती एका सरळ रस्त्यावर, महाद्वार रोड वर सरस्वती , लक्ष्मी व कावळा नाक्याकडे संगम अशी सर्व भागात १५ टॉकीज त्यावेळी होती आणि सर्व टॉकीज भरपूर सिनेमासक्त लोकांमुळे तेजीत होती. आता महिनाभर पण एक सिनेमा चालत नाही तेव्हा गोल्डन ज्युबिलीचा बोर्ड सर्रास लागत असे.सकाळी ११ ते रा. १पर्यंत या भागात प्रचंड वर्दळ असायची. अभिनेते, अभिनेत्री यांचे फॅन्स अगदी अंधभक्त  हे एकच सिनेमा सात वेळा