"बघ, पुन्हा तोच मुर्खपणा करायला जातोयस.""नाही. अरे खरंच काही वेगळं होतं हे."हे गेल्यावेळीही तू म्हणाला होतास.""पण यावेळी . . .""यावेळी काय?""जाऊ दे सोड.""मीही तेच बोलतोय. जाऊ दे. सोड."दोन सेकंद शांत राहून. तो पुढे म्हणाला"एकदा बोलायला मिळालं असतं तर . . .""हां . . . तर काय? आणि काय बोलणार होतास?""नको राहू दे.""तेच बेस्ट आहे तुझ्यासाठी.""जसं मला काही हे माहितच नाही ना!""माहिती आहे ना तुला. मग कशाला विचार करतोयस?""ऐक ना . . .""आता काय राहिलंय?""तुला क्वांटम फिजिक्सची एक थेअरी माहितीय का?""तू काय बरळतोस हेच समजत नाहीये."तो हसायला लागला. "तरीपण बोल ना! माहितीये ना तुला ‘ती’ थेअरी.""म्हणजे! अरे तुला माहितीये म्हणजे मलाही माहिती