ऊमाच्या मनात आले बरे झाले ही आत्ता क्लासला गेली .सतीश आला तर निदान आपल्याला त्याच्याशी थोडेसे बोलायला तरी वेळ मिळेल .आणि त्याच्या आणि नयनाच्या भेटीची वेळ पुढे जाईल ...काय आणि कसे हे विचार करीत ती तशीच बसून राहिली .पोह्याचा घास तिच्या घशाखाली काही केल्या उतरत नव्हता .पोहे, चहा थंडगार झाले तरी तिचे लक्षच नव्हते.तसेच चमच्याने पोहे चिवडत ती बसली होती .अचानक ती भानावर आली आणि तिने उठून गार चहा आणि पोहे तसेच कट्ट्यावर ठेवून दिले .बाहेर येऊन ती बेडवर बसून राहिली .तिचे डोके पण बारीक दुखू लागले होते .तिने घड्याळ बघितले तर दहा वाजायला आले होते .अजूनही सतीशचा मात्र पत्ता नव्हता ना निरोप