"नुसते फोनवरच बोलत ठेवणार आहेस मला ..?की मला भेटायची इच्छाच नाहीय तुझी .?आणि माझा इतक्या वर्षाचा यातनामय प्रवास मी फोनवर असा दहा पंधरा मिनिटात सांगू असे तुझे म्हणणे आहे का ..?सतीश इतके बोलेपर्यंत अचानक फोन कट झाला .ऊमाने फोनकडे पाहिले ..आणि परत तो फोन नंबर रीकॉल केला .पण तो लागेना ..थोडा वेळ वाट पाहून परत लावला आता आउट ऑफ नेटवर्क कव्हरेज ..असा मेसेज येत होता .ऊमाला वाटले.. तरी एक मात्र बरे झाले आत्ता सुजाता नुकतीच निघून गेली होती .नाहीतर हे फोनवरचे बोलणे तिला समजल्यावाचून राहिले नसते .ऊमा शांतपणे परत सतीशचा फोन येईल अशी वाट पाहत राहिली .विचारांची आवर्तने तर मनात चालूच होती... सतीशला भेटायची, त्याची खरेच काय अवस्था आहे हे जाणून