पुनर्मिलन - भाग 26

या नवीन आयुष्यात ऊमाला मोहनचा फार आधार होता .मोहन वर्षातून तीन चार वेळा त्या दोघींना भेटून जात असे .नयनाच्या प्रत्येक वाढदिवसाला मोहन न चुकता येतच असे .त्या त्या वेळी हटकून  ऊमा आणि मोहनला सतीशची आठवण सतावत असे . होता होता अशीच दहा वर्षे पार पडली .ऊमा आता तिच्या या आयुष्यात चांगलीच स्थिरावली होती .या वाड्यात आल्यानंतर तिचे खूपच भले झाले होते .वाड्यातील सगळेच लोक खूपच चांगले होते .त्यांनी कधीही ऊमाला तिच्या भूतकाळाविषयी विचारले नव्हते ना कधी तिला तिच्या भूतकाळाची आठवण होऊ दिली .नयना आता हायस्कूलमध्ये शिकत होती.ती अत्यंत हुशार असल्याने प्रत्येक वर्षी पहिला नंबर काढत होती .शाळेतली एक गुणी विद्यार्थिनी म्हणून तिचे नाव