Chapter 15 : शेवटच्या सावलीचा श्वास प्रियंकाच्या हातातली ती वहिचं पान आणि शुभांगीची बाहुली – दोन्ही तिच्यासाठी आता केवळ गोष्टी नव्हत्या , तर जबाबदारीचं प्रतीक झालं होतं. झाड शांत झालं होतं , पण गावात एक गूढ शांतता पसरली होती – जणू सगळे श्वास रोखून पुढचं संकट वाट पाहत होते . एक नवा आसरलेला चेहरा दुसऱ्या दिवशी , दीपकने शंकरनाथकडे धावत येत सांगितलं , “गावाच्या जुन्या कबरस्थानाजवळ एक नवं खड्डं दिसलंय ... ताजं मातीचं . ” ते तिघं तिथं गेले . खड्डा पाहिला तर ताजं रक्त आणि त्यावर एक वाक्य कोरलेलं दिसलं : " ती अजूनही तिथंच आहे . "