डेथ स्क्रिप्ट - भाग 2 - अध्याय 6

  • 45

अध्याय ६ --------------अंतिम लढाई ----------------डॉ. फिनिक्सला एका जुन्या, गंजाळलेल्या लोखंडी खुर्चीला घट्ट बांधून ठेवले होते. त्यांच्या कपाळाला जोडलेले यंत्र भीषण, जांभळ्या प्रकाशात तळघरातील अंधार भेदत होते, जणू त्यांच्या मेंदूतील प्रत्येक कप्पा उघडत होते. आर्यन, निशा आणि रिया त्यांच्यासमोर उभे होते.“तु हरला आहेस, फिनिक्स!” आर्यनचा आवाज विजेसारखा तळघरात घुमला. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा क्रूर उन्माद होता. “तुझ्या डोक्यातील सर्व ज्ञान, 'क्रोनोस' चा प्रत्येक अल्गोरिदम आणि प्रत्येक गुपित—आता माझे आहे. तु आम्हाला जे क्रेडिट दिले नाही, ते आता मी जगाकडून मिळवणार आहे.”डॉ. फिनिक्सला त्यांच्या आयुष्यातील सर्वात असह्य, तीव्र वेदना होत होत्या. हॅकिंगमुळे त्यांच्या वैयक्तिक आठवणी (विक्रम, रिया, आणि त्यांच्या आई वडिलांच्या प्रतिमा) त्यांच्या मनातून हिंसकपणे