स्वतःचा उद्धार करायचा असेल तर

स्वतःचा उद्धार करायचा असेल तर......?        *दि. १४ ऑक्टोबर १९५६. खरं तर हा दिवस धर्मांतराचा दिवस. मी हिंदू म्हणून जन्म घेतला. कारण जन्म घेणं माझ्या हातात नव्हते. परंतु मी हिंदू म्हणून मरणार नाही. कारण ते माझ्या हातात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतरण का केलं? त्याचं कारण आहे, येथील तमाम हिंदू लोकांनी बाबासाहेबच नाही तर त्यांच्या समाजातील लोकांना भारत स्वतंत्र्य झाल्यानंतरही चांगली वागणूक दिली नाही. म्हणूनच धर्मांतरण. कदाचित आम्ही धर्म जर सोडला तर आम्हाला हिंदूंचा संपर्कच येणार नाही. त्यांचे देव, त्यांच्या परंपरा आमच्यापासून कोसो दूर राहतील. मग काय, आम्हाला आमच्या मनानं जगता येईल. समाजात भेदभाव नसेल. तसंच सगळ्यांना सन्मानानं