संतांची अमृत वाणी - 4

                  " समर्थांची शिकवण "                                        साठच्या (1960) दशकात शालेय पाठय क्रमात "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास" होता. प्राचीन काळी हिंदुस्थानात आर्य व अनार्य अशा दोनच जमाती होत्या. आर्य हे वैदिक धर्माचे पालणकर्ते व उपासक होते. आ पली वैदिक संस्कृती खूप जुनी आहे. त्या पुरातन वैदिक संस्कृतीत यज्ञ, दान आणि तप यांना अनन्य साधारण महत्त्व होतं. त्या काळात मोठमोठे यज्ञ व्हायचे. ईश्वरप्राप्तीच्या मार्गतले हे टप्पे होते. परंतु यज्ञ करायचा म्हणजे खूप धन द्रव्य हवं. त्या यज्ञात दानाची