********१०*********************** मंदोदरीचा विवाह झाला होता व आता ती सुखात होती. कारण तिच्या पट्टराणी बनल्यानं प्रजा सुखी होती. परंतु ते सुख तिला पचत नव्हतं. तर तिला ते सुख दुःखच वाटत होतं एकप्रकारचं. जे दुःख तिला सहन होत नव्हतं. मंदोदरीला दिवसभर काही वाटत नव्हतं. जेव्हा ती प्रजेत मिसळत असे. परंतु जेव्हा रात्र असायची व विभीषण तिच्या महालात नसायचा. तेव्हा ती एकाकी असायची. तेव्हा आठवायचा तो वेदनादायी काळ. ज्या काळात तिनं बरंच दुःख भोगलं होतं. असाच तो प्रसंग आठवला तिला. तो सुलोचनेच्या बाबतीतील होता. ज्यात मेघनादाचा वध लक्ष्मणानं केला होता व त्यांच्या परिवाराला ती गोष्ट माहीत