******८*********************** मंदोदरी घरी आली होती. तसा तिला विचार आला होता तिच्या विवाहाचा. तोच तिनं आपल्या कमऱ्याचा दरवाजा आतमधून लावून घेतला व स्वतःला दाराच्या आत कोंडून टाकलं नेहमीसारखं व विचार करु लागली विवाहाचा. एक मन म्हणत होतं, 'मी विवाह करावा. तोही माझ्या पतीचा हत्यारा त्या विभीषणाशी. तो विभीषण की ज्यानं ऐन वेळेस माझ्या पतीचा साथ सोडला. तो जावून भेटला त्या रामास की ज्यानं माझ्या प्रिय पतीची हत्या केली. जर तो माझ्या पतीकडून असता तर रामाला मारताच आलं नसतं माझ्या पतीला. कारण माझे पती हे अमर होते. त्यांच्यात विचारांचं आत्मबळ होतं. ते ज्ञान