मंदोदरी - भाग 7

  • 147

**७*********************** मंदोदरी घरातल्या घरात होती. तिनं बंदिस्त करुन ठेवलं होतं चार भिंतीत. तिला आठवत होता तिचा पती. पती परमेश्वर जरी नसला तरी तिचा पती तिच्यासाठी परमेश्वरच होता. तशी स्री जरी वंशवाढीची देवी जरी असली तरी त्याही काळात स्रियांना दुय्यम दर्जा मिळत होता. ते पाहून तिच्याही मनात कलह निर्माण झाले होते. असंख्य विचार तिच्या मनात येत होते. तशी ती एकाकी असल्यानं असंख्य विचार तिच्या मनात चालायचेच. ज्यातून ती अतिशय दुःखीच होत होती. वाटत असायचं की असं कुढत कुढत जगण्याऐवजी पती शरणावरच मरण पावली असती तर बरं झालं असतं. आज सतीप्रथा राहिली नाही. आज पती मरण ही तेवढी दुःखाची बाब मानली जात