मंदोदरी - भाग 6

  • 108

*******६********************* सुलोचना मंदोदरीची स्नुषा. इंद्रजीतची भार्या होती. तिला सतत दुःख जाणवायचं इंद्रजीतशी विवाह केल्याबद्दल. मंदोदरीही सुलोचनेसारखाच विचार करीत होती. तशी ती एकदा सुलोचनेला भेटली. तिच्या कक्षात गेली होती ती. त्यातच सुलोचनेनं तिला बिरादरीबद्दल प्रश्न केला. त्थावर तिचं सांत्वन करण्यासाठी ती म्हणाली, "सुलोचना, स्वर्गलोक राक्षस समजतात आपल्या बिरादरीला. परंतु आपल्या बिरादरीतील लोकांचं काय चुकलं. ही देव मंडळी पुरातन काळापासून आमचा रागच करतात. राग करतात की आम्हीच देवांना त्रास दिला. परंतु देव आणि राक्षस ही एकाच बापाची मुलं. परंतु ज्यावेळेस समुद्रमंथन झालं. तेव्हा समुद्रात मिळालेल्या अमृतकलशातील अमृताचं वाटप करण्यात आलं होतं. ज्यात दोन रांगा बनविण्यात आल्या. ज्यात अमृतवाटप हे एकाच रांगेत सुरु