मंदोदरी - भाग 5

  • 135
  • 57

*******५******************* 'मी असा कोणता अपराध केला की राक्षसाच्या घरी येवून पडले.' सुलोचनाचा तो विचार. तसा तिच्या मनात बराच विचार होता. ती विचार करीत होती, 'म्हणतात की स्वर्ग हा वेगळा आहे. तो पृथ्वीचा भाग नाही. पृथ्वीवर फक्त माणसंच जन्म घेतात. देव नाही. देव देवलोकात अर्थात स्वर्गभुमीत जन्म घेतात. जिथं ब्रम्हांड असतं. जिथं सात्विक लोकं राहतात. ते जर वाईट कर्म करीत असतील तर त्यांच्या त्यांच्या पापकर्मानुसार ते ते पापकर्म भोगण्यासाठी त्यांना थेट पृथ्वीवर पाठवलं जातं. जिथं नरकयातनाच जास्त असतात. स्वर्गात पाप करणारी मंडळी ही स्वर्गातून दंडीत झाल्यावर पृथ्वीवर आली की ती चांगले वर्तन ठेवत नाहीत. ते आपलं वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे ठेवतात.