मंदोदरी - भाग 3

  • 51

*****३********************** मंदोदरीही काही कमी नव्हती. ती पुर्वजन्मातील एक अप्सराच होती. तसं पाहिल्यास तिनं भगवान शिवाला प्रसन्न करुन एक वर मागितला होता. मला महापराक्रमी व विद्वान, पंडीत व्यक्ती मला पती म्हणून मिळावा. त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले व त्यांनी तिला वर दिला. ज्यानुसार रावण तिला पती म्हणून लाभला. जो विद्वान होता. पंडीत होता व तसाच तो महापराक्रमीही होता. रावणाचे दोन भाऊ होते. विभीषण आणि कुंभकर्ण. कुंभकर्णाचा विवाह बलीची मुलगी वज्रज्वालाशी झाला होता. तसेच विभीषणाचा विवाह गंधर्वराज शैलेषची मुलगी सरमाशी झाला होता. त्यातच तिघंही आपआपल्या संसारात खुश होते. रावण व मंदोदरीचा विवाह हा भगवान शिवाच्या आराधनेतून झाला. तिची व त्याची पहिली भेट