मंदोदरी - भाग 2

*******२******************          मंदोदरी सात्विक होती व ते सात्विकतेचं बाळकडू तिला तिच्या आईनंच पाजलं होतं लहानपणी. तसं पाहिल्यास तिची आईही तिच्याजवळ जास्त दिवस राहिली नाही.            मंदोदरीच्या आईवडिलांचं नाव मय व हेमा. ज्या मयचा जन्म कश्यप ऋषी व दितीच्या गर्भातून झाला होता व हेमा ही एक स्वर्गातील अप्सरा होती. मंदोदरीला दोन भाऊ व एक बहीण होती. एक मायावी व दुसरा दुदूंभी. त्यांनीही तिच्यावर फारसे असे संस्कार केले नाही. परंतु भावानं तिला प्रेम दिलं व तिला कोणताच असा फारसा त्रास होवू दिला नाही.            मंदोदरीची आई हेमा ही स्वर्गातील अप्सराच होती. ती पाताळलोकातील