अध्याय ३ -------------धोका ----------रात्रीचे जवळपास २ वाजत आले होते. तिघांचे जेवण झाले होते. त्यांनी बिल पे केले आणि तिघांनी ठरवले की प्रयोगशाळेत परत जाऊयात. डॉ. फिनिक्स, कर्नल विक्रम सिंग आणि रिया मल्होत्रा गाडीत बसले.नैनितालच्या त्या टेकडीवरील शांत रस्त्यावर विक्रमची गाडी वेगाने धावत होती. रेस्टॉरंटमध्ये जेवण झाल्यानंतर ते तिघे परत प्रयोगशाळेकडे निघाले होते.कर्नल विक्रम सिंग गाडी चालवत होता, पण त्याचे लक्ष फक्त आरशातून मागच्या सीटवर बसलेल्या डॉ. फिनिक्स यांच्याकडे होते. सैनिकी प्रशिक्षणामुळे विक्रमला कोणाच्याही देहबोली आणि हावभावावरून लगेच समजत असे की समोरचा व्यक्ती काहीतरी लपवत आहे किंवा मोठ्या तणावाखाली आहे. डॉ. फिनिक्स यांची बैचेनी आणि चेहऱ्यावरील विचलित भाव त्याला स्पष्टपणे दिसत होते.मागे बसलेले डॉ.