पुनर्मिलन - भाग 25

ऊमाने मोहनला आणि त्याच्या मित्राला परत परत आग्रहाने वाढले .सर्वांचे खाऊन झाल्यावर ऊमाने नयनाला सर्वांच्या पाया पडायला लावले आणि सर्वांनी तिला भरभरून आशीर्वाद दिले .मोहनमामाला आणि त्याच्या मित्राला नयनाने नमस्कार केला .मोहनने नयनाला जवळ घेतले आणि त्याच्या मित्राने नयनाला भातुकलीचा खेळ भेट दिला . तेव्हढ्यात नयनाला आठवले ,“मामा अरे तुझे सरप्राईज गिफ्ट कुठे आहे ?”नयनाचा हा प्रश्न ऐकल्यावर ऊमा पण थोडी बिचकली ..नयनाच्या डोक्यात एकदा एखादी गोष्ट शिरली की त्याचे निराकरण झाल्याशिवाय गप्प बसत नसे .आता काय करणार मोहन ?अशा प्रश्नार्थक नजरेने तिने मोहनकडे बघितले .मोहन नयनाकडे बघून म्हणाला ..अरेच्या विसरलोच ...थांब गाडीतून घेऊन येतो असे म्हणून तो बाहेर पडला .नयनाच्या मित्र मैत्रिणी सगळे  आता खाणे झाल्यावर