पुनर्मिलन - भाग 24

  • 69

ऊमाचे आता स्वयंपाकाचे काहीच काम शिल्लक नव्हते फक्त मोहन आल्यावर जेवायला बसताना पुरी आणि ताजे वडे तळायचे होते .संध्याकाळच्या बटाटेवड्याची पण तयारी झाली होती तिच्याकडे आता वाट बघणे इतकेच शिल्लक होते . शांतपणे बाहेरच्या खोलीत टीव्ही लाऊन ती बसली .काय लागले होते टीव्ही वर याकडे तिचे लक्षच नव्हते मनात विचार विचार आणि समोर नुसतीच चित्रे फिरत होती .काही वेळातच नयना धावत धावत आली .घड्याळ पाहून म्हणाली , “आई मोहनमामा कसा नाही आला अजून ?मला फार भूक लागलीय ..त्याला फोन कर ना कुठे पोचला आहे बघ तरी ..”नयनाचे अजून काही प्रश्न यायच्या आत ऊमा म्हणाली ,“हे बघ नयन ..मोहनमामाचा फोन आला होता आत्ताच ..त्याची गाडी रस्त्यात बंद पडली