हे ऐकून ऊमा म्हणाली हो ..तिच्या मनाची तयारी झाले हे मला समजले आहे .आता सगळे एकदा व्यवस्थित जुळून आले म्हणजे बरे होईल उद्या सकाळी नऊ वाजता सतीशला यायला सांगितले आहे चौकात तो भेटला की येतोय आम्ही साडेदहा अकरा पर्यंत “हो मोहन .. ऊमा म्हणाली सांगितले सगळे नयनाने मला फार खुश होती बघा ..या तुम्ही उद्या आणि मी सांगितले आहे तसे मला वेळोवेळी मेसेज करीत रहा बर का “ऊमाला होकार देऊन मोहनने फोन ठेवला .ऊमा परत बाहेरच्या खोलीत आली आणि नयनाशेजारी झोपून तिच्या अंगावर हलकेच हात टाकला.उद्या काय काय होईल ..कसा असेल सतीश ...?बाबाचे नाव घेणे सोडलेल्या नयनाला आवडेल का परत बाबाला भेटायला काय होईल तिची प्रतिक्रिया ?एक ना दोन ..शंभर प्रश्न मनात येत होते तिच्या लेक