मोहन म्हणाला मला माहित आहे नयना माझ्या फोनची वाट पाहत असणार उद्या मी नयनाला फोन करणार आहेच तिच्या वाढदिवसाला मी नक्की येणार आहे असे सांगायला आणि शिवाय तिला गिफ्ट काय हवे आहे ते सुद्धा विचारायच आहे मला ..तेव्हा मी तिला सांगेन मी तुझ्यासाठी आणखी एक खास गिफ्ट आणणार आहे ते तुला खूप खूप आवडेल असे ..आणि मग ऐनवेळी मी माझ्यासोबत सतीशला घेऊन आल्यावर तिची आणि तिच्या बाबाची भेट होईल वाढदिवसाला ती खूप आनंदात असणार अशावेळी बाबाची भेट झाल्यावर तिला नक्कीच आनंद होईल .निदान त्या दिवशी तरी तिची नाराजी जरी असेल तरी दाखवू शकणार नाही .सतीशला पण मी त्या दिवशी फोनवर सांगितले आहे की तु सुद्धा अगदी चांगल्या इस्त्रीच्या कपड्यात ये ..म्हणजे नयनाही आनंदाने तुझा स्वीकार करेल ..मी त्याला