********************** १२ ******************* ते आरक्षण..... आरक्षण होतं, नोकरीसाठी. राजकारण करण्यासाठी अन् शिक्षणासाठी. परंतु ते आरक्षण जरी असलं तरी प्रभास आणि सृष्टीनं त्यांची नोकरी जाताच आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आपली मुलं शिकवली स्वतःच्याच पैशानं. शिक्षणाचंही शुल्क भरलं. कारण होतं समाधान. आत्मीक समाधान. ते समाधान की उद्या काळ गेल्यानंतर स्वतःला वाटेल व अभिमानानं सांगता येईल की मी स्वतःच्या पैशानं शिकवलं. त्यावेळेस आपली छातीही इंचभर वाढलेली असेल. तसंच त्यांना वाटत होतं की आपली मुलंही समाधान व्यक्त करतील. म्हणतील की आरक्षण होतं, परंतु आम्ही आरक्षणाचा फायदा घेतला नाही. आम्ही स्वतःच शिकलो. आमच्या वडिलांनी स्वतःच त्यांच्या पैशानं शिकवलं. कुणासमोरही आमच्या