प्रकरण १४विश्रांती नंतर कोर्ट सुरु झालं. टेप रेकॉर्डर टेप लावून सज्ज करण्यात आला. कोर्टातल्या भिंती वरच्या इलेक्ट्रिक पॉइंटला एक्स्टेन्शन लावून त्याचे सॉकेट जोडण्यात आले.सर्वाना नीट ऐकू यावे म्हणून स्पीकर जोडण्यात आला.“ टेप चालू करा. आणि मला कोर्टात शंभर टक्के शांतता हव्ये.नाहीतर मी त्याला बाहेर काढेन.” न्यायाधीशांनी आदेश दिला.टेप चालू झाला. उन्मन आणि बंब यांच्यातील संवाद ऐकू यायला लागले.“ डॉ.बंब.... ऐकू येतंय तुम्हाला?.... डॉक्टर, ... ऐकू येतंय? असेल तर हो म्हणा....”मधे थोडा वेळ कसलाच आवाज आला नाही नंतर अगदी दमून बोलल्या सारखा आवाज आला,“ हो.”“ तुम्हाला कोणी फटका मारला माहित्ये?” उन्मन चा आवाज आला.पुन्हा शांतता. पुन्हा तोच प्रश्न.“ ज्याने तुम्हाला मारलं,