डेथ स्क्रिप्ट - भाग 2 - अध्याय 1

  • 246
  • 72

हा भाग वाचण्याआधी वाचकांना विनंती आहे की त्यांनी "डेथ स्क्रिप्ट -भाग १" आधी वाचवा. अध्याय १------------नवा खेळ --------------नैनितालच्या शांत, हिवाळी रात्रीने संपूर्ण शहर आपल्या मिठीत घेतले होते. डोंगरांवर आणि इमारतींच्या छतांवर बर्फाचा हलका, चमकदार थर जमा झाला होता, ज्यामुळे सर्वत्र एक शांत आणि चांदीसारखा देखावा दिसत होता. शहर बर्फाच्या हलक्या थराने आच्छादले गेले होते, सगळीकडे बर्फ दिसत होता, संपूर्ण शहरावर बर्फाची चादर पसरली होती. शहराच्या मुख्य गर्दीपासून थोडे दूर, एका टेकडीच्या पायथ्याशी, काळ्या देवदार वृक्षांच्या दाट सावलीत एक नुकतीच उभी राहिलेली अत्याधुनिक प्रयोगशाळा होती. ही प्रयोगशाळा बाहेरून साधी दिसत असली, तरी तिच्या आत जगाचे भविष्य सुरक्षित ठेवले होते.या प्रयोगशाळेच्या केंद्रात, तीन अत्यंत महत्त्वाचे