संतांची अमृत वाणी - 3

                  " नामस्मरणास योग्य वेळ "               संत महात्म्यानी श्रवण, कीर्तन, स्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन असे नऊ प्रकार सा. सांगितले आहेत. यालाच ' नववीधा भक्ती ' असे म्हणतात. सर्वसाधारण माणसं स्मरण भक्ती या मार्गाचा अवलंब करतात. स्मरण भक्ती  म्हणजे नामस्मरण किंवा नामजप भक्ती होय.          पहाटेच्या वेळच्या नीरव शांततेत आपलं लक्ष परमेश्वरीं अस्तित्वाकडे केंद्रित करावे. पहाटेच्या वेळी आपलं मन फुलासारखं ताज असतं. सुगंधित असतं. मनात जर त्या परमेश्वराच्या नामस्मरणाची साखळी रुणझुणायला लागली तर आपल्या मनात परमेश्वराच्या चिंतनाच्या मंद घंटा वाजू