आर्या - हम्म..आई - चल आता जेवून घेऊया मला फार भूक लागलीय. आर्या - हो चालेल. तू बस मी ताट वाढून घेऊन येते आपल्यासाठी.आता पुढे.....जेवून झाल्यावर आर्या रूम मधे आली. सकाळी लवकर उठल्यामुळे तिला झोप येत होती. तिने आपलं अंग बेडवर झोकून दिलं आणि निद्रेच्या अधीन झाली.. इथे गंधार सुद्धा त्याच्या घरी पोहचला होता. त्याची आजी बाहेर गार्डन मधे झोपल्यावर बसली होती. गांधारला बघितल्यावर त्यांच्या चेहऱ्यावर स्माईल आली. त्यांनी प्रेमानी त्याला हाक मारली आणि गंधार त्यांच्याकडे वळला...गंधार - आजी इथे काय करतेस? आजी - काही नाही रे असच जरा वाऱ्यावर बसले होते. घरात बसून बसून कंटाळा आला होता म्हणून.गंधार - का? आज आजोबा