तुझ्याविना... - भाग 5

रोहन - मस्त नजारा आहे ना?गंधार - हम्म. रोहन हसायला लागला. त्याच्या हसण्याने गंधार भानावर आला आणि आता आपण काय माती खाल्ली याची जाणीव त्याला झाली. त्याने रोहन कडे रोखून बघितलं आणि म्हणाला लेक्चर मधे लक्ष दे.आता पुढे.....रोहन - अरे माझं लक्ष लेक्चर मधेच आहे. पण तुझं मात्र न्हवत हे मी खात्रीने सांगतो.   गंधार - गप्प बसतोस का आता?रोहन - ओके बॉस. गंधार ला आता आपण काय विचार करत होतो याचा राग आला. नाही गंधार तुझं ध्येय नेहमी लक्षात ठेव. तुला विचलित होऊन चालणार नाही. ह्या सगळ्या गोष्टीत तुला पडायचं नाहीय. गंधार ने डोक्यात आलेले सगळे विचार झटकले आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर