काकुच्या त्या संसारातले .. भांडीकुंडी आणि डबे आटोपशीर होते ते मात्र उपयोगी येतील म्हणून तिने बरोबर नेण्यासाठी बांधून ठेवले काकुच्या दोन तीन साड्या आणि काकांचे दोन पायजमा शर्ट स्वतःजवळ आठवण म्हणून उमाने ठेवले आणि बाकीचे त्या दोघांचे कपडे तिने वृद्धाश्रमात देऊन टाकले .उरलेले त्यांचे सर्व सामान वृद्धाश्रमात दिल्यावर ..दुपारपर्यंत ऊमाने वाड्यातील सर्वांचा निरोप घेतला .त्तीचाही लग्नापूर्वी वाड्यातील लोकांशी ऋणानुबंध होताच .त्यांना आता कायमचेच सोडून जायला लागणार होते .त्या सर्वांना सुद्धा ऊमाला निरोप देताना जड जात होते .पुढील चांगल्या आयुष्याची स्वप्ने सोबत घेऊनच ऊमा हे घर सोडत होती .त्यामुळे सर्वानीच तिला शुभेच्छा दिल्या . जन्मापासून काकुच्याच घरात वाढली असल्याने ..वाड्यात नयनाने खुप दोस्त मंडळी जोडली होती