व्याजाच्या पैशात कसेतरी भागत होतेतसे थोडेफार तिच्या वडिलांचे पैसे पण अजुन होते काकांच्या खात्यावर थोडे ठेवीमध्ये गुंतवलेले पैसे पण होते ..काकांच्या ठेवीचे आणि इतर सगळे पैसे त्यांच्या मृत्युनंतर ऊमाने क्लेम करून मिळवले आणि काकुच्या हातात दिले होते .मला आता हे काय करायचे आहेत असे म्हणून काकूने ते परत ऊमाच्या ताब्यात दिले होते .या सर्व घडामोडीत मोहन भावासारखा तिच्या पाठीशी होता .सतीशचा पत्ता अजूनही लागला नव्हताच .हळूहळू पोलिसांनी ती केस बंद करून टाकली आणि ऊमाला सतीशच्या परतीची एक आशा होती तीही जवळ जवळ सुटून गेली.एक दीड वर्ष कसेतरी पार पडले आणि अचानक काकुला कर्करोगाचे निदान झाले .बिचारीच्या नशिबाचे भोग अजून संपले नव्हते .तिच्या बऱ्याच तपासण्या झाल्या .नंतर केमोथेरपीचे