बोलता बोलता तिने विषय काढला“काका किती दिवस झाले सतीशचा काहीच पत्ता लागत नाहीय ..काय करावे समजेना झालेय “काय करावे ते समजत नाही असे ऊमा म्हणताच काका म्हणाले ,”होय तु त्याची बायको म्हणून तुला त्याची काळजी वाटणे साहजिक आहे पण पोरी पोलीस शोधात आहेतच की त्याच्या शोध लागला की सांगतील ना..... तु कशाला काळजी करतेस? तसे म्हटले तर बराच काळ उलटला आहे त्याला बेपत्ता होऊन .पण देवावर विश्वास ठेव ग यातून काहीतरी चांगलेच निघेल .नक्की पत्ता लागेल सतीशचा ,नको काळजी करूस आम्ही आहोतच की, आमचे घर म्हणजे तुझे माहेरच आहे हे इथे तुम्ही दोघी सुरक्षितच आहात.तसाच काही एकटेपण वाटत असेल तर नयनाला घेऊन थोडे दिवस इथे राहायला ये