तिला असे वाटणे पण ही तर एक फक्त शंकाच होती .आणि ती माणसे कोणत्या गावची होती तेही तिला माहित नव्हते .कदाचित ते गाव कोणते आहे हे तेव्हा समजले असते तर सतीश तिकडे गेला आहे का हे तरी बघता आले असते . पण मुळात सतीश जुगारात पैसे हरल्याची आणि त्याला धमकी द्यायला गुंड आले होते ही गोष्ट तर फक्त तिलाच माहित होती. दिवस अतिशय कठीण झाले होते .असाच आणखी एक महिना कसातरी गेला .आता एकूण दोन महिने झाले होते सतीशला बेपत्ता होऊन .तरीही काहीच पत्ता लागत नव्हता .एके दिवशी संध्याकाळी ऊमा ऑफिसमधून नयनासोबत घरी परत येताच ते वृद्ध गृहस्थ म्हणजे त्यांच्या घराचे मालक भाडे मागायला दारात आले .त्या