आयुष्य...कधी एक उमलती धग, कधी निवांत विझणारा चंद्रगोल.क्षणोक्षणी आपलं रूप पालटणारा एक प्रवाह...कधी केशरासारखा सुवासित, तर कधी मेथीसारखा कडवट, पण आरोग्यदायी.या दोन्हीच्या सीमारेषेवर, एका स्त्रीचं अस्तित्व सावधपणे ताठ उभं आहे...ही कथा आहे तिची..ती.....जी उमेदीच्या कड्यावर असूनही, स्वतःच्या आयुष्याच्या रंगमंचावरून निमूटपणे उतरली.ती ....चेहऱ्यावर अपराजित तेज, डोळ्यांत असंख्य विश्वांची झळाळी, आणि ओठांवर न बोललेले अनुभव.कला तिचं देणं होतं....ती बोलायची अभिनयात, श्वासायमान होत असलेल्या प्रत्येक भूमिकेत