ट्रेडिंग सेटलमेंट सायकल मित्रांनो, आपण आज एखादा शेअर डिलीवरी मध्ये म्हणजेच काही दिवस होल्ड करण्यासाठी खरेदी केला असेल तर तो आजच आपल्या डीमॅट अकाऊंट मध्ये जमा होत नाही, त्यासाठी एक दिवसाचा वेळ लागतो. यालाच t+1 ट्रेडिंग सायकल म्हटले जाते. T म्हणजे ज्या दिवशी ट्रेड / व्यवहार पार पडला तो दिवस आणि +1 म्हणजे व्यवहार झालेल्या दिवसाला वगळून पुढचा आणखी एक दिवस. म्हणजे एखाद्याने सोमवारी शेअर खरेदी केला तर तो मंगळवारी दिवसाअखेर त्याच्या डीमॅट अकाऊंटमध्ये जमा झालेला दिसेल. जर मंगळवारी सुट्टी असेल तर मग तो बुधवारी होईल. सध्या आपल्या देशात t+1 ट्रेडिंग सायकल लागू आहे. हे ट्रेडिंग सायकल t+0 करण्यासाठी सेक्यूरिटीज