यात्रा दोन दिवसांवर आली होती, त्यामुळे आजोबांकडे कामाची खूपच गडबड होती. आजोबा शेतातील अवजारे पासून ते बैलगाडीपर्यंत सर्व काम स्वतः करायचे. त्यामुळे त्यांच्याकडे खूप लोक लांबून काम करून घेण्यासाठी येत होते. आजोबा आणि मी बाहेरच्या पत्र्याच्या शेडमध्ये काम करत होतो. मी आजोबांना मदत म्हणून आज त्यांच्या हाताखाली काम करत होतो. तेवढ्यात शेजारच्या काकू आल्या.“अरे, तू कवा आलायस? आणि कोण-कोण आलंय?” त्यांनी विचारलं.मी: “सकाळीच आलोय. घरात सगळेच आहेत.”काकू: “जा, आईला बोलवून आण.” त्या उंबराखाली असलेल्या कट्ट्यावर बसल्या, आणि आजोबा म्हणाले,“लवकर घेऊन ये आईला, आज खूप काम पडलंय. अजून या चार खुरप्यांना धार लावायची आहे, आणि त्या बैलगाडीचं पण काम करून द्यायचंय.”