डेथ स्क्रिप्ट - 7

अध्याय ७--------------शेवट म्हणजेच नवीन सुरुवात ------------------------------------प्रयोगशाळेतील वातावरण आता एखाद्या युद्धाच्या मैदानासारखे झाले होते. 'क्रोनोस' च्या आतून येणारा भयानक आवाज, लाल रंगाचा प्रकाश आणि यंत्राची थरथर, या सर्वांनी एक भयावह परिस्थिती निर्माण केली होती. डॉ. फिनिक्स 'क्रोनोस' च्या कन्सोलजवळ उभा होता, त्याच्या डोळ्यात फक्त एकच दिसत गोष्ट होती - यंत्र बंद करणे. पण त्याच्या समोर निशा, त्याला थांबवायला उभी होती, तिच्या डोळ्यात एक क्रूर, वेडासारखी चमक होती.“तू खूप उशीर केलास, डॉक्टर!” ती ओरडली. तिचा आवाज यंत्राच्या आवाजात मिसळून गेला होता. “आता हे सर्व संपेल! हे यंत्र माझे आहे! हे डेथस्क्रिप्ट आहे, आणि मी येथे लिहिते!”तिने कन्सोलवर अनेक बटणे दाबून यंत्राला ओव्हरलोड केले. यंत्रातून एक