" भक्तच जेंव्हा देव होतो....!" स्वतःच अस्तित्व विसरून जेव्हा माणूस भगवंताच्या अनुसंधानात रममाण होतो, तेव्हा तो एक साधक न राहाता, ईश्वरापासून अलग राहून त्याच्या नामस्मरणात दंग होत नाही, तर तो त्याचाच होऊन जातो. भक्त ईश्वरामध्ये आपोआप विलीन होतो. त्याला वेगळे अस्तित्वच राहात नाही. संत तुकाराम महाराजही म्हणतात कीं " देव पाहवयाशी गेलो | तेथे देव होऊनिया ठेलो |" साधक (भक्त) जगत असलेल्या देहाला समष्टीचे संदर्भ शिल्लक राहातच नाहीत. तो आपोआप सर्वांचा होऊन जातो. चंद्राची शीतल किरणं जशी सर्वत्र सारखी पडतात तसा तो सर्वांसाठीच शीतल होऊन जातो. सर्वांना हवाहवासा वाटू लागतो. अशा माणसाच्या