आर्यानी नाश्ता संपवला आणि कॉलेज साठी निघाली. रस्त्यात तिची गाडी एका सिग्नल जवळ थांबली होती तेवढ्यात तिच्या बाजूला एका मुलाने त्याची बाईक थांबवली. आर्याने एक चोरटा कटाक्ष त्याच्या बाईक वर टाकला. लेटेस्ट मॉडेल ची व्हाइट कलर ची बाईक होती. नवीनच वाटत होती एकदम. बाईक बघता बघता तीच लक्ष त्याच्या गोऱ्या हाताकडे गेल. त्यावरच ब्रँडेड वॉच आणि त्यानंतर असलेल्या टॅटू मुळे तिला एकदा त्याच तोंड पहायची इच्छा झाली. ती बघणार इतक्यात सिग्नल सुटला आणि त्याची गाडी पुढे निघून गेली. तीच मन उगाच खट्टू झालं मग तिने मनातले विचार झटकले आणि गाडी स्टार्ट केली.आता पुढे...आर्या कॉलेज ला पोहचली. तिने तिची स्कूटी पार्क