मोहनच्या बोलण्याने आलेले डोळ्यातले पाणी पुसून ऊमाने त्या पैशातील दोन लाख रुपये मोहनच्या ताब्यात देऊन ती रक्कम त्याने ऑफिस मध्ये भरावी असे सुचवले .पण मोहन म्हणाला, “ वहिनी मी सांगतो ते आता नीट ऐका ..हे बघा हे पैसे तुम्ही उद्या ऑफिसमध्ये येऊनस्वतःच साहेबांच्याकडे द्या आणि त्यांना सांगा की घरीच हे मोहनने ठेवले होते . पैसे बँकेत भरण्यासाठी आणले असणार आणि नंतर कदाचित तो विसरला असावा .कपाटातले हे पैसे मी ताबडतोब ऑफिसमध्ये घेऊन आले आहे .असे जर सांगितले तर ते जास्त सयुक्तिक ठरेल. आणि सतीशचा हेतू चांगला होता याची ऑफिसमध्ये खात्री होईल .पुढच्या सर्वच दृष्टीने हे योग्य ठरेल “मोहनच्या बोलण्यात दूरदर्शीपणा होता तो ऊमाला पटला .प्लानप्रमाणे मोहन आधी