स्वतःला दोष देताना.... काकांना ह्या स्थळाची नीट चौकशी न केल्याबद्दल अतिशय वाईट वाटत होते .ऊमाच्या आईवडीलांच्या माघारी तिचे कल्याण करण्याऐवजी त्यांच्या हातुन तिच्या आयुष्याचे नुकसान घडले होते.काय उत्तर देणार होते ते तिच्या स्वर्गीय मातापित्यांना ..?असे ते सारखे सारखे बोलू लागले .आता तर काकुंसोबत काकांच्या पण डोळ्यातून अश्रू वाहायला लागले . ऊमाने कसेतरी दोघांना शांत केले .ती म्हणाली , “काका यात तुमची काहीच चुक नाही.. दोष असेल तर हा माझ्या नशिबाचा आहे .तुम्ही तर नेहेमी माझ्या भल्याचाच विचार केला आहे .मला आपल्या मुलीसारखे वाढवले आहे .. असो... आता जे झाले ते झाले ...आता आपल्याला पुढला विचार करायला हवा.मग तिने काकांना मोहनने सुचवलेला पर्याय सांगितला .त्या पर्यायानुसार ती