पुनर्मिलन - भाग 13

मोहनने असे विचारल्यावर ऊमा म्हणाली “मोहन मी सतीशला शोधायला ऑफिसमध्ये येत होते ,पण तुम्ही सगळे घरी का आला आहात ?असे ऊमाने मोहनला विचारल्यावर मोहन म्हणाला,”वहिनी ऑफिसमधले काही व्यवहारांचे पैसे काल साहेबांनी सतीशकडे दिले होते .साहेबांनी ते पैसे ताबडतोब त्याला बँकेत भरायला सांगितले होते .मात्र काल ते पैसे बँकेत जमा झालेलेच नव्हते आणि  सतीश पण जो काल बाहेर गेला पैसे भरायला तो परत ऑफिसला आलाच नाही त्याचा फोनही बंद येत होता म्हणून आम्ही त्याला शोधायला घरी आलो होतो  .ही रक्कम थोडीथोडकी नव्हती ,दोन लाखाच्या आसपास होती.हे ऐकून ऊमाला काय बोलावे  सतीश बेपत्ता होता आणि ऊमाला पण तो कुठे गेलाय हेच माहित नव्हते .त्यामुळे सतीश परत आला की