पुनर्मिलन - भाग 12

जवळची शिल्लक तर सगळीच संपली होती .पुढे काय करायचे हे ठरवायला तिने ऑफिसमध्ये अर्ज देवून रजा वाढवून घेतली .तिचा पगार व्हायला अजुन पंधरा दिवस होते .आता या आकस्मिक खर्चासाठी तिला मैत्रिणीकडून थोडे पैसे उसने घ्यायला लागले . पैशाची अडचण आता कशी भागवायची असा विचार करताना .तिच्या लक्षात आले आपल्या हातात चार बांगड्या आहेत त्या गहाण ठेवून थोडे पैसे उभे करता येतील .संध्याकाळी ती काहीतरी कारण काढून घरातून बाहेर पडली आणि सोनाराकडे गेली .हातातल्या बांगड्या गहाण ठेवण्यासाठी तिने सोनाराला दाखवल्या .त्या हातात घेताक्षणी सोनाराने स्पष्ट सांगितले की ह्या खोट्या आहेत .हे ऐकुन ती थक्कच झाली ,शंका आल्यामुळे तिने मंगळसूत्र पण दाखवुन घेतले .तिच्या