फजिती एक्सप्रेस - भाग 19

  • 393
  • 93

कथा क्र. १२: नाम्याची मिसळगावात नाम्याचं नाव घेतलं की लोकांच्या तोंडात हसू फुटायचंच. "फजिती" हा शब्दच त्याच्या नावासोबत जोडला गेला होता. जसं कुणी गोडबोले म्हटलं की "गोड बोलतो", तसं कुणी "नाम्या" म्हटलं की लगेच डोळ्यांसमोर फजितीचा सिनेमा सुरू व्हायचा. कुठं गेला तरी त्याची काहीतरी गडबड व्हायचीच. पार हे असं होतं की सूर्य पश्चिमेला उगवला तरी चालेल, पण नाम्या कुठंही गेला आणि तिथं काही बिनसलं नाही. असं कधीच होणार नाही.त्यादिवशी सकाळी नाम्याने उठून डोळे चोळले, अंग टाकलं, आणि अचानक विचार केला."आज काहीतरी भारी खायचंय... रोजचं रोज पोहे-उपमा खाऊन जिवाला कंटाळा आलाय. चला, आज मस्त झणझणीत मिसळ खायचीच!"हे जणू त्याच्या मेंदूला वीजेचं