अकाऊंट ओपनिंग व प्रायमरी मार्केट गुंतवणूक मित्रांनो, रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी पुढील गोष्टींची आवश्यकता असते: १) बँक अकाऊंट: रोखे बाजारात गुंतवणूक करण्यासाठी, देशातील कोणत्याही मोठ्या बँकेमध्ये, बँक अकाऊंट असणे गरजेचे आहे. अशी बँक निवडा जिचे एटीएम कार्ड मिळते, जी बँक ऑनलाइन सुविधा देते, जिचे अकाऊंट UPI सुविधांबरोबर लिंक करता येते. यामुळे ट्रेडिंग अकाऊंटमध्ये पैसे टाकणे सोयीस्कर होईल. २) ट्रेडिंग अकाऊंट: ट्रेडिंग अकाऊंटचा वापर करून आपण रोखे बाजारातील खरेदी-विक्रीचा व्यवहार करू शकतो. ट्रेडिंग अकाऊंट शिवाय असा व्यवहार करता येत नाही. हे ट्रेडिंग अकाऊंट आपल्याला स्टॉक ब्रोकर्सच्या माध्यमातून काढता येते. आपल्या देशात अनेक स्टॉक ब्रोकर्स उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे आपल्याला ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने